Actor Govinda : मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेयरमुळे गोविंदाचा होतोय घटस्फोट? याआधी या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:15 IST2025-02-25T19:11:53+5:302025-02-25T19:15:41+5:30

Govinda : गोविंदा आणि सुनिता अहुजा ३७ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्याचे ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच गोविंदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गोविंदा आणि सुनिता अहुजा ३७ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्याचे ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याचे बोलले जात आहे. पण गोविंदाचे असे अभिनेत्रीसोबत नाव जोडल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही या अभिनेत्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

गोविंदाच्या अफेअर लिस्टमध्ये पहिलं नाव आहे ९०च्या दशकातील सुंदर अभिनेत्री नीलम कोठारीचं. असं म्हटलं जातं की, एकेकाळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. नीलमशी लग्न करण्यासाठी या अभिनेत्याने आपली एंगेजमेंटही तोडली होती. पण नंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झालं.

गोविंदाचं नाव बॉलिवूडच्या धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितसोबतही जोडले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, दोघांचे बरेच दिवस अफेअर होते. पण याचा पुरावा कधीच सापडला नाही.

या यादीत रवीना टंडनचंही नाव आहे. जिने गोविंदासोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांचे काही वर्षांपूर्वी अफेअर होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

गोविंदाबद्दल असंही म्हटलं जातं की, त्याला अभिनेत्री दिव्या भारतीही आवडायची. एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या बातम्याही मासिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाल्या होत्या.

गोविंदाने १९८७ मध्ये सुनीता आहुजासोबत लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे टीना आणि यशवर्धन आहुजा या दोन मुलांचे पालक झाले.

पण आता गोविंदा आणि सुनीता लग्नाच्या ३७ वर्षांनंतर विभक्त होत असल्याच्या बातम्या येत आहेत. याचे कारण गोविंदाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे सांगितले जात आहे.

गोविंदाचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’ होता. ज्यामध्ये तो नीलम कोठारीसोबत दिसला होता. दोघांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यामुळे हा अभिनेता रातोरात स्टार झाला.