किसींग सीन्स देण्यावर दिग्दर्शकांचा भर, 'हेट स्टोरी' नंतर अभिनेत्रीने कायमचा बॉलिवूडला ठोकला राम राम By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 07:05 PM 2021-04-15T19:05:13+5:30 2021-04-15T19:10:34+5:30
बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. बंगाली सोबतच तिनं हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘हेट स्टोरी’ या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आली होती.
विशेष म्हणजे या चित्रपटात तिनं केलेल्या किसिंग सीन्समुळं ती प्रचंड चर्चेत होती.
बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेत्रींना दुय्यम स्थान दिले जाते. आजही अभिनेत्यांसाठी अभिनेत्री या शोभेचीच बाहुली असल्याचे तिने म्हटले आहे.
बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं पाओलीला वाटतं.
बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासूनच पाओली दामकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या.
मात्र आता तिला किसिंग सीनचाच वीट आला आहे. त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच जाहीर करुन टाकलं आहे.
सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम असेच सीन्स दिले पाहिजेत.पण तेच ते काम करुन नवीन काही करायला मिळतच नाही.
पाओली 'रात बाकी है' वेब सीरिजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.