गौरीइतकीच सुंदर दिसते यशची रिअल लाइफ पार्टनर; तीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 07:00 AM2022-02-16T07:00:00+5:302022-02-16T07:00:00+5:30

Abhishek deshmukh: अनेकदा अभिषेक त्याच्या पत्नीसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या पत्नीविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिषेक देशमुख.

या मालिकेत अभिषेकने यश देशमुख ही भूमिका साकारली आहे. यश हा अरुंधतीचा सर्वात लाडका मुलगा असल्याचं या मालिकेत पाहायला मिळतं.

कलाविश्वाप्रमाणेच यश म्हणजेच अभिषेक सोशल मीडियावरही सक्रीय आहे.

अनेकदा अभिषेक त्याच्या पत्नीसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या पत्नीविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते.

अभिषेकप्रमाणेच त्याची पत्नीदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिषेकच्या बायकोचं नाव कृतिका देव असं आहे.

कृतिकाने 'राजवाडे अॅण्ड सन्स', 'हॅपी जर्नी' आणि 'हवाईजादा' यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

अभिषेकप्रमाणेच कृतिकाही सोशल मीडियावर सक्रीय आहे.आता अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

कृतिकाने तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो