विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं अमिषा पटेलच्या आलं अंगाशी, बर्बाद झालं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:56 PM2024-11-15T15:56:05+5:302024-11-15T16:05:30+5:30

Amisha Patel : अमिषा पटेलचा पदार्पणातला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर तिने बरेच हिट चित्रपट दिले पण करिअरच्या एका टप्प्यात विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं तिला महागात पडले आणि तिचे करिअर संपुष्ठात आले.

गदर २ अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते.

सध्या ती करोडपती बिझनेसमन निर्वाण बिर्लाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. खरेतर तिने सोशल मीडियावर निर्वाणसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर या चर्चेला उधाण आले. मात्र तुम्हाला माहित आहे का, की अमिषा पटेल एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली होती. ज्यामुळे तिचे करिअर संपुष्ठात आले.

अमिषा पटेल विवाहित दिग्दर्शक विक्रम भटच्या प्रेमात पडली होती. मात्र हे नात काही दिवसानंतर तुटलं.

अमिषा पटेलने एका मुलाखतीत सांगितले होते की, विक्रम भटसोबतच्या नात्याबद्दल पब्लिकली बोलल्यामुळे तिचे करिअर बर्बाद झाले. अभिनेत्री म्हणाली होती, याच कारणामुळे ती एक दशकाहून जास्त काळ पुरुषांपासून दूर राहत होती. ब्रेकअपपूर्वी अमिषा आणि विक्रम बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते.

विक्रम भट अमिषाच्या आधी सुष्मिता सेनसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र सुष्मितासोबतच्या ब्रेकअपनंतर तो लगेच अमिषाला डेट करू लागला होता. असे सांगितले जाते की, अनकही (२००६) चित्रपटादरम्यान डेट करायला सुरूवात केली. असे सांगितले जाते विक्रम भटचा सिनेमा १९२० (२००८)च्या रिलीजच्या आधीच त्यांचे ब्रेकअप झाले होते.

अमिषा पटेलने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भटसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. म्हणाली होती की, या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणाचे स्वागत नाही आणि मी त्यातली आहे. जी खूप प्रामाणिक आहे. मी त्यातली आहे जी आपल्या मनातले बोलते. मला वाटते की, ही माझ्या लाइफमधील सर्वात मोठी कमतरता आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली, मी फक्त दोन रिलेशनशिप्स सार्वजनिकपणे स्वीकारल्या, त्यांचा माझ्या करिअरवर परिणाम झाला आणि त्यानंतर १२-१३ वर्षे मी माझ्या आयुष्यात कोणालाही परवानगी दिली नाही. आता मला माझ्या आयुष्यात फक्त शांती हवी आहे."

तिच्या व्यावसायिक जीवनावरील परिणामाबद्दल बोलताना अमिषा म्हणाली, "सिंगल स्टेटस असलेली मुलगी तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता त्यांच्यासाठी नेहमीच आकर्षक असते. तुमच्या प्रेक्षकांसाठीही ती नेहमीच आकर्षक असते आणि त्यांना वाटते की तुम्ही सिंगल असाल किंवा तुम्ही इंडस्ट्रीतील कोणाला किंवा सुपरस्टारला डेटिंग करत असाल तर त्याचा तुमच्या करिअरला फायदाच होईल, अन्यथा ते ते स्वीकारत नाहीत.

अमिषा पुढे म्हणाली, हे बघा, हिरोला डेट करणारी हिरोईन अजूनही हिरोसोबत चित्रपट करू शकते आणि तिला काम मिळत राहील. माझ्यासाठी, तो मुद्दा नव्हता. त्यामुळे मार लागतो पण तुम्ही त्यातून शिकायला मिळते.

याआधी अमिषासोबतच्या नात्याबद्दल बोलताना विक्रमने सांगितले होते की, मला तिच्याशी कधीच लग्न करायचे नव्हते. त्याने २०१७ च्या मुलाखतीदरम्यान एचटी ब्रंचला सांगितले होते की, .नाही, मला त्यांच्यापैकी कोणाशीही लग्न करायचे नव्हते.