फोटोग्राफरने फसवलं, मॉडेलचे BOLD फोटो 'अडल्ट' बेवसाईटवर Upload तरीही गुन्हा नाहीच; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 01:48 AM2023-05-13T01:48:53+5:302023-05-13T02:06:05+5:30

फोटो व्हायरल झाले, मॉडेलला मैत्रिणीकडून कळलं, इतकं सारं होऊनही तिला काहीच करता आलं नाही

Photographer Cheating, Model Sava Schultz Bold Photos: मॉडेलिंगची आवड असलेल्या लोकांसाठी एक विचित्र घटना समोर आली आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या फोटोशूटसाठी जाल तेव्हा तुमचा फोटोग्राफर किती विश्वासार्ह आहे हे निश्चितपणे ठरवा. अन्यथा, या मॉडेलचे जे झाले ते तुमच्यासोबतही होऊ शकते.

२१ वर्षीय सावा शुल्झला तिच्या मैत्रिणींकडून समजले की तिचे काही बोल्ड फोटो अॅडल्ट वेबसाइट्सवर व्हायरल होत आहेत. यानंतर मुलीने स्वतः ते चेक करण्याचा निर्णय घेतला. मुलीने वेबसाइटवर जाऊन तिचे फोटो पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सावा शुल्झ नावाच्या मुलीला मॉडेलिंगची खूप आवड होती. वयाच्या 19व्या वर्षी ती एका फोटोग्राफरकडे गेली आणि तिने स्वतःचे काही बोल्ड फोटो काढले.

यानंतर, फोटोग्राफरने हे सर्व फोटो त्यांच्या संमतीशिवाय अडल्ट वेबसाइटवर अपलोड केले आणि हे फोटो पाहताच व्हायरल झाले.

यानंतर सवाचे बोल्ड फोटो अडल्ट वेबसाइटच्या माध्यमातून तिच्या मित्रांपर्यंत पोहोचले. याबाबतची माहिती तिच्या मैत्रिणींमार्फत सावापर्यंत पोहोचली तेव्हा ती खूप खजील झाली.

वयाच्या 21 व्या वर्षी जेव्हा सावा शुल्झला फोटोग्राफरच्या या घाणेरड्या कृत्याबद्दल कळले तेव्हा तिला त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा होता पण सावा फोटोग्राफरवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकली नाही.

फोटोग्राफरने सावा शुल्झचा विश्वासघात केला आणि एका प्रौढ वेबसाइटवर तिचे बोल्ड फोटो लीक केले, पण तिला काहीच करता आले नाही.

सोशल मीडियावर लाखो लोक या मॉडेलला फॉलो करतात. मॉडेल सावा शुल्झ अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असते. पण तरीही ती हतबल होती कारण...

सावाने छायाचित्रकाराशी कोणताही लेखी करार न केल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही.