सिनेमात खरंच हिरोईन बोल्ड सीन्स देतात? 'या' ट्रीक्स वापरुन केले जातात सीन शूट; 'अनेकदा दोघांच्यामध्ये...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 02:37 PM2023-06-11T14:37:15+5:302023-06-11T15:07:37+5:30

हे जरुरी नाही की सीन जसा दिसतो तो तसाच शूटही होतो.

रोमँटिक किंवा बोल्ड सिनेमात इंटिमेट सीन (Intimate Scenes) असणं ही कथेची गरज असते. त्यामुळे दिग्दर्शकांना असे सीन्स शूट करावे लागतात. तसंच बोल्ड सीन्समुळे अनेक प्रेक्षकही आकर्षित होतात. सध्या ओटीटी माध्यमात तर इंटिमेट सीन्स जास्त वाढले आहेत.

आजकाल स्टोरीलाईन पेक्षा जास्त लक्ष बोल्ड सीन्सवरच असतं. जेणेकरुन सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जवळपास सगळ्याच वेबसिरीज मध्ये इंटिमेट दृश्य असतातच. पण हे सीन्स शूट करण्यासाठी दिग्दर्शकापासून ते क्रू मेंबर्स सर्वांनाच पापड लाटावे लागतात.

तुम्हीही पाहिलं असेलच की अनेक सिनेमा, वेबसिरीजमध्ये इंटिमेट सीन, किसींग सीन असतात. पण हे सीन्स कसे शूट होतात असा प्रश्न पडला असेलच. दिग्दर्शक, क्रू मेंबर्ससमोर अभिनेत्री सहज सीन द्यायला तयार होत असेल का? तर हे जरुरी नाही सीन जसा दिसतो तो तसाच शूटही होतो. यामागे बऱ्याच ट्रीक्स आहेत त्या कोणत्या ते बघुया..

बऱ्याचदा अभिनेत्री इंटिमेट सीन्स देण्यास नकार देतात. तेव्हा दिग्दर्शकाकडे प्लॅन बी तयार असतो. यासाठी दिग्दर्शक बॉडी डबलचा वापर करतो. कथेची गरज पाहता आणि अभिनेत्रीचं म्हणणं लक्षात घेता वेगळ्या प्रकारे सीन शूट होतो. अशा वेळी दोघांच्यामध्ये एक आरसा ठेवला जातो आणि दोघेही आरशालाच किस करतात. मात्र बघताना असं वाटतं की ते एकमेकांनाच किस करत आहेत.

जर हिरो किंवा हिरोईन बोल्ड सीन देणार नसतील तर अशावेळी इल्यूजनची निर्मिती करुन ब्युटी शॉट्सने काम चालवावं लागतं. सिनेमॅटोग्राफीच्या अशा काही साधनांचा वापर केला जातो ज्यामुळे काही घडताच प्रेक्षकांना वाटेल की बरंच काही झालं आहे. हग करणे, किस करणे, हातात हात देणे हे कॅमेऱ्याच्या अशा अँगलने शूट केले जातात ज्यामुळे बॉडी पार्ट्स दिसणार नाहीत.बेडवर सॅटिनच्या बेडशीट्सचा वापर केला जातो ते कव्हर करुन इल्युजनची निर्मिती केली जाते.

अनेकदा दिग्दर्शक क्रोमा शॉट्स घेऊन सीन शूट करतो. निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या कव्हरसोबत शूट करुन नंतर एडिटिंगवेळी ते काढले जाते.म्हणजेच एखाद्या किसिंग सीनवेळी दोघांच्यामध्ये कारलं, भोपळा सारख्या भाज्या ठेवल्या जातात. हिरव्या रंगाचं असल्याने या भाज्या क्रोमाचं काम करतात आणि दोघंही त्या भाज्यांना किस करतात.पोस्ट प्रोडक्शनमध्ये त्या भाज्यांना काढून टाकले जाते आणि बघणाऱ्यांना सीन खरा वाटतो.

एखादा कलाकार हे ठरवू शकतो की इंटिमेट सीन देताना त्याला दुसऱ्या कलाकाराच्या शरिरापासून किती लांब राहायचे आहे. इंटिमसी कोऑर्डिनेटरही कलाकाराच्या निर्णयाचा आदर करतो. यासाठी काही प्रॉप्स जसे की मऊ उशी, क्रोच गार्ड, मोडेस्टी गार्मेंट सारख्या वस्तूंचा वापर केला जातो.

कोणतेही इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी दोघांच्या सहमतीची आवश्यकता असते. तसंच दोघांचे प्रायव्हेट पार्ट्स एकमेकांना स्पर्श करु नये याची खबरदारी घेतली जाते.यासाठी क्रिकेट प्लेयर्ससारखंच अभिनेत्यासाठी लोगार्ड कुशन किंवा एयर बॅगचा वापर होतो. तर अभिनेत्रींसाठी पुशअप पॅड्स, समोरुन सिलिकॉन पॅड्सचा वापर केला जातो.