किती जन्म झाले.. तूझी प्रेमिका मी..., अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:37 PM2023-10-06T18:37:33+5:302023-10-06T18:42:01+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. फक्त अभिनयानेच नाही तर तिने सौंदर्याच्या जोरावर रसिकांना भुरळ घातली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. फक्त अभिनयानेच नाही तर तिने सौंदर्याच्या जोरावर रसिकांना भुरळ घातली आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते.

प्राजक्ता माळीने नुकतेच इंस्टाग्रामवर साडीतले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंसोबत तिच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, विसरू नको श्रीरामा मला..मी तूझ्या पाऊली जीव वाहिला..प्रिया…किती जन्म झाले.. तूझी प्रेमिका मी..कितीही नव्याने तूला भेटले मी..तूझी सावली झाले, घेउनी हिंडले सतीचा वसा.. प्रिया…

प्राजक्ता माळीने या फोटोत गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर फुलांची डिझाईन आहे.

तिने साडीवर नाकात नथ, केसात गुलाबाचे फुल, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या तिने घातल्या आहेत. तसेच गळ्यात तिने मोहनमाळ घातली आहे.

प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोतील तिच्या स्मित हास्यावर रसिक फिदा झाले आहेत.

प्राजक्ता माळी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.

सध्या ती सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे.