भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, 15 वर्षांपासून एकही हिट सिनेमा नाही, तरीदेखील कोटींची संपत्ती, कोण आहे ती? By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:31 PM 2024-08-30T18:31:51+5:30 2024-08-30T18:52:04+5:30
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीच्या चित्रपटांनी अनेक वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर कोणतीही कमाई केली नाही. पण तरीही ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. Hurun India’s Rich List 2024 : नुकतंच 'हुरून इंडिया रिच लिस्ट २०२४' रिलीज झाली. या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावांसह, त्यांच्या कमाईच्या आधारे त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. या यादीतील मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची एकूण संपत्ती जाणून लोकांना धक्का बसला.
या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासोबतच मनोरंजन विश्वातील एका सौंदर्यवतीचाही समावेश आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीच्या चित्रपटांनी अनेक वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर कोणतीही कमाई केली नाही. पण तरीही ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
ती अभिनेत्री दुसरी कोणीही नसून जुही चावला (Juhi Chawla) आहे. होय, जुही ही देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
'हुरून इंडिया रिच लिस्ट २०२४' या यादीत मनोरंजन क्षेत्रातील पाच सेलिब्रिटींनीही स्थान मिळवले आहे.
शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर तर जुही चावला (Juhi Chawla Net Worth) ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. हृतिक रोशन तिसऱ्या, अमिताभ बच्चन चौथ्या आणि करण जोहर पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री जुही चावलाने बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना देखील मागे टाकले आहे.
जुही ही कलाकारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असली, तरी अभिनेत्रींबद्दल बोलायचं झाल्यास ती पहिल्या क्रमांकावर येते. कारण, या यादीत दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीनं स्थान मिळवलेलं नाही.
या यादीत जुही चावला आणि तिच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 4,600 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे जुही चावला ही चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नाही. पण, शाहरुख खानसोबत आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सचा मालकीण असणे तिच्यासाठी फायदेशीर ठरले आहे.
जुही चावलाच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत, ती ऐश्वर्या राय (900 कोटी रुपये), प्रियांका चोप्रा (850 कोटी रुपये), आलिया भट्ट (550 कोटी), दीपिका पदुकोण (400 कोटी रुपये) आणि कतरिना कैफ (रु. 240 कोटी) या इतर भारतीय अभिनेत्रींपेक्षा पुढे आहे. यापैकी एकही अभिनेत्री 'हुरून इंडिया रिच लिस्ट २०२४' मध्ये स्थान मिळवू शकली नाही.
अफाट संपत्तीची मालकीण जुही चावला अतिशय आलिशान जीवन जगते. जूही ही बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसत नाही, परंतु ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि लाइफ अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आजही जुहीचे लाखो चाहते आहेत जे तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.