Aakash Chopra Wife Aakshi, Romantic Photos: आकाश चोप्राची पत्नी दिसते खूपच सुंदर! तुम्ही पाहिलेत का त्यांचे रोमँटिक फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 01:44 PM2022-03-26T13:44:18+5:302022-03-26T13:55:44+5:30

त्याची पत्नी सोशल मीडियावर अनेक फोटोज आणि व्हिडीओज पोस्ट करत असते.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा हा आजपासून IPL 2022 च्या कॉमेंट्रीमध्ये व्यस्त असणार आहे. त्याआधी त्याने आपल्या पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला.

आकाश चोप्राच्या पत्नीचं नाव आक्षी माथूर-चोप्रा. ती दिसायला खूप सुंदर असून एक उत्तम फॅशन स्टायलिस्टदेखील आहे.

एका रिपोर्टनुसार, आकाश-आक्षी यांचं लग्न २००९ साली झालं आणि त्यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एका मुलीचं नाव आरणा चोप्रा आहे.

आक्षी चोप्रा ही खूपच प्रतिभावान आहे. तिचा स्वत: कस्टमाईज्ड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. ELEVEN11_soapery असं तिच्या ब्रँडचं नाव आहे.

आक्षी चोप्रा तिच्या इन्स्टाग्रामवर कायम फोटोज, व्हिडीओ शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूपच अँक्टीव्ह असते.

आक्षी चोप्रा ही कंटेट प्रोड्युसरदेखील आहे.

तिला क्रिकेट पाहायला खूप आवडतं. आकाश चोप्राची कॉमेंट्रीदेखील तिला आवडते असं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.

आकाश चोप्राच्या बरोबरचे अनेक रोमँटिक फोटोज ती कायम पोस्ट करत असते.

सर्व फोटो - इन्स्टाग्राम