Arun Lal Bulbul Saha Haldi Ceremony: हळद लागली! अरूण लाल-बुलबुल यांच्या हळदी समारंभाचे फोटो पाहिलेत का? (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:57 PM2022-04-26T18:57:41+5:302022-04-26T19:17:20+5:30

घटस्फोटित पत्नीच्या परवानगीनेच दुसरं लग्न करत असल्याची चर्चा

Arun Lal Bulbul Saha Haldi Ceremony Photos: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक अरूण लाल हे ६६व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्यापेक्षा वयाने २८ वर्षे लहान असलेल्या बुलबुल साहा हिच्याशी त्यांचा नुकताच हळदी समारंभ पार पडला.

या दोघांच्या लग्नाची बातमी पसरताच अनेकांनी सोशल मीडियावर विविध मतं मांडली. त्याच दरम्यान अरूण लाल आणि बुलबुल यांच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले.

६६ वर्षीय अरूण लाल आणि ३८ वर्षीय बुलबुल यांनी निकटवर्तीयांच्या आणि ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत हळद समारंभ केला. हळदीसाठी नवरीने सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती.

हळद समारंभासाठी अरूण लाल यांनीही छानपैकी पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. भावी नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्य वातावरण प्रफुल्लित करत होतं.

अरूण लाल आणि बुलबुल यांच्या हळद समारंभाचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

अरूण लाल यांच्या पहिली पत्नी रिना हिच्याशी घटस्फोट झाला आहे. रीना यांची तब्येत काही दिवसांपासून थोडी खराब आहे. त्यामुळे रीना यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या परवानगीनेच अरूण लाल दुसरं लग्न करत असल्याचे सांगितलं जात आहे.