International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:22 PM2024-06-21T13:22:35+5:302024-06-21T13:36:02+5:30

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण योग करणारे कलाकार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत.

सिनेमा शूटिंग किंवा रोजच्या धावपळीतून वेळ काढत सेलिब्रिटीदेखील आवर्जून योग साधना करतात. फिटनेससोबच मनाची एकाग्रता आणि मन:शातीसाठी योगाचा उपयोग होतो.

फिटनेसच्या यादीत शिल्पा पहिल्या क्रमांकावर आहे. मनाच्या शांततेसाठी आणि शरीर सुधृढ राहावे यासाठी ती कायमच योगा करते.

या यादीत दुसरे नाव मलायका अरोरा हिचं आहे. मलायका बॉलिवूडची फिटनेस आयकॉन आहे. वय हा फक्त एक आकडा असल्याचं तिनं आपल्या फिटनेसने सिद्ध केलं आहे. अभिनेत्री नियमितपणे योगा करते.

अभिनेत्री आलिया भट ही उत्साही, निरोगी आयुष्य जगण्याची आकांक्षा बाळगणारी अशी अभिनेत्री असून चाहत्यांना ती नेहमीच प्रेरणा देते.

अभिनेत्री करीना कपूरदेखील नियमित योगा करते. करीना सडपातळ शरीरयष्टीसाठी आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी योगासनं करते.

अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही योगा करायला आवडतं. आजच्या काळात योग किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या चाहत्यांना योग करण्यासाठी प्रेरित करत असते.

अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील नियमित योगा करते. तिनं कायम योगाला कायम महत्व दिलं. फिट राहण्यासाठी अनुष्काचा योगा करण्यावर भर असतो.

सारा अली खानही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगाची मदत घेते. अभिनेत्री अनेकदा तिचे योगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

या यादीत जान्हवी कपूरचाही समावेश आहे. जान्हवी कपूरदेखील फिटनेस फ्रिक आहे. जान्हवी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यावर आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगा करण्यावर विश्वास ठेवते.

"धकधक गर्ल" माधुरी दीक्षितदेखील बॉडी फ्लेक्सिबल आणि फिट ठेवण्यासाठी योगा करते.