झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 02:05 PM2024-10-13T14:05:54+5:302024-10-13T14:17:02+5:30

Jitendra Kumar : जितेंद्र कुमारने सांगितलं की, त्याच्या आयुष्यात एक क्षण असाही आला जेव्हा त्याला काही महिने जंगलात एका झोपडीत राहावं लागलं.

जीतू भैया या नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता जितेंद्र कुमार इंडस्ट्रीतील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या नवीन मुलाखतीत त्याने घरं आणि नात्याबद्दल सांगितलं आहे.

सायरस ब्रोचा यांच्याशी झालेल्या संवादात जितेंद्र कुमारने सांगितलं की, त्याच्या आयुष्यात एक क्षण असाही आला जेव्हा त्याला काही महिने जंगलात एका झोपडीत राहावं लागलं.

अभिनेत्याने म्हटलं की, त्याचा जन्म राजस्थानमधील अलवर येथील खैरथल येथे झाला. "आमची जंगलात एक झोपडी होती. आमची जॉईन्ट फॅमिली तिथे राहायची."

"आमच्याकडे एक पक्क घर आणि एक झोपडी होती. मला अजूनही आठवतं की, मी तिथे झोपायचो आणि मला विचित्र वाटायचं. पण हे काही काळासाठीच होतं."

"माझे वडील आणि काका सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि मीही. त्यांनी लवकरच आणखी दोन खोल्या बांधल्या. त्यामुळे आम्ही सहा-सात महिने झोपडीत राहिलो, त्यानंतर घराचं बांधकाम सुरू झालं."

"वयाच्या ११ व्या वर्षी पेंटर आणि कारपेंटर यांच्याकडे रोजंदारी मजूर म्हणून काम करत असे. या गोष्टीमुळे वडील फार नाराज झाले होते."

"उन्हाळ्याच्या सुटीत मी पेंटर, कारपेंटर यांच्यासह मजुरीचं काम करायचो. मला दिवसाला ४० रुपये मिळायचे. मग माझ्या वडिलांना कळलं आणि ते मला ओरडले" असं अभिनेत्याने म्हटलं आहे.

जितेंद्र कुमार 'कोटा फॅक्टरी' आणि 'पंचायत' सारख्या सीरीजसाठी ओळखला जातो. त्याने 'शुभ मंगल ज्यादा सावधान'सह इतर चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

जितेंद्र कुमारचे असंख्य चाहते असून तो नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतो. त्याचे जबरदस्त फोटो शेअर करत असतो.