Tara Vs Bilal Release Date: 'तारा वर्सेस बिलाल'ची रिलीज डेट जाहीर, जॉन अब्राहम निर्मित असलेला चित्रपट या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:01 PM2022-08-23T17:01:12+5:302022-08-23T17:01:12+5:30

अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट "तारा वर्सेस बिलाल" 14 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

समर इक्बाल दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनिया राठी प्रमुख भूमिकेत आहेत.

J.A. एंटरटेनमेंट बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अब्राहमने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. त्याने लिहिले, "हर्षवर्धन राणे आणि सोनिया राठी स्टारर रोमँटिक ड्रामा 'तारा व्हर्सेस बिलाल'

कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि जॉन अब्राहम निर्मित, समर इक्बाल दिग्दर्शित या चित्रपटात तारा आणि बिलाल या दोन विरुद्ध पात्रांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे."

या चित्रपटातील राणे आणि सोनिया राठी यांचा फर्स्ट लूकही रिलीज केला.

या चित्रपटाची पटकथा संयुक्ता चावला शेख यांनी लिहिली आहे. 'तारा वर्सेस बिलाल' ची सहनिर्मिती मीनाक्षी दास आणि शिव चनाना यांनी केली आहे.