एक लाजरा न साजरा मुखडा…काजल अग्रवालचं भुरळ पाडणारं सौंदर्य, फोटो पाहिलेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 04:06 PM2024-05-28T16:06:10+5:302024-05-28T16:14:45+5:30

काजल अग्रवाल हे फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

आजही तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनातील आपली जागा कायम ठेवली आहे.

काजल अग्रवाल ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

काजल ही वेस्टर्न आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारचे कपडे अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते. देसी लूकमध्ये तर ती अधिकच सुंदर दिसते.

काजल अग्रवाल तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

काजल अग्रवालने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे तुफान व्हायरल होतायेत.

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काजलने हे फोटोशूट केलं आहे. कानात मोठे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

काजल अग्रवालने हिंदीप्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील तिच्या कामाचे चांगलेच कौतुक होते.

बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरूवात काजल अग्रवाल ही करोडोंची मालकीण आहे.

काजल अग्रवाल तिच्याकडे बऱ्याच लक्झरी कार आहेत. यात बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, मिनी कूपर आणि ऑडी या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.