काजोलनं सांगितलं आयुष्याचं रहस्य, फोटो पोस्ट करत म्हणाली "आवडणाऱ्या गोष्टी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 17:30 IST2025-04-13T17:14:06+5:302025-04-13T17:30:17+5:30
काजोल आपल्या आयुष्याबाबत सोशल मीडियाद्वारे खुलेपणाने बोलताना दिसते.

काजोल देवगण ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या काजोलनं आतापर्यंत अनेक हीट चित्रपट दिले आहेत.
काजोल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करते असते.
आताही काजोल हिनं साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय.
वयाच्या ५०व्या वर्षी देखील काजोलचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
काजोलने फक्त आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ केलं नाही, तर तिनं एक खास सल्लाही दिलाय.
फोटोंना दिलेल्या कॅप्शनमधून तिनं चाहत्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा सल्ला दिलाय.
कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "आयुष्याचे रहस्य म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणे".
काजोलची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर विविध कमेंट केल्या आहेत.