लवकरच हा शो टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले करण-बिपाशा आणि कपिल शर्माचा कॉमेडी धमाका यामुळे या शोमध्ये सतत हास्याचे फवारेच उडत होते.हे दोघेही लव्हबर्ड्स गेल्या महिन्यात म्हणजेच ३० एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले.पिस्ता कलरच्या साडीत नववधू बिपाशाचे सौंदर्य खुलून दिसत होते तर राखाडी रंगाच्या सूटमध्ये करणही एकदम हँडसम दिसत होता.कपिलचा हा शो खूप फेमस असून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी इथे हजेरी लावत असतात. करण व बिपाशा मात्र त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमासाठी इथे हजर राहणार आहेत.बॉलिवूडमधील हॉट कपल बिपाशा-बसू व करणसिंग ग्रोव्हर दोघेही नुकतेच विवाहबंधनात अडकले असून त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र लग्नानंतर त्यांनी पहिल्यांदाच एकत्र एका कार्यक्रमाला हजेरी लावली असून तो शो म्हणजे 'दि कपिल शर्मा शो'...