'गटबाजी संपली तर अभिनेत्यांची अर्धी दुकान बंद होतील'; करण पटेलने साधला बॉलिवूडवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 03:49 PM2023-10-08T15:49:30+5:302023-10-08T15:55:18+5:30

Karan patel: बॉलिवूड कलाकारांविषयी प्रश्न विचारताच संतापला करण पटेल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण पटेल. ये है मोहब्बतें या मालिकेत रमण भल्ला ही भूमिका साकारुन त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. करण लवकरच डरन छू या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

करणने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. त्यामुळे सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. करणने थेट बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमधील गटबाजी संपली तर अनेक कलाकारांची दुकानं बंद होती, असं थेट वक्तव्य त्याने केलं आहे.

अलिकडेच करणने 'DNA' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील लोकांची टीव्ही स्टार्सबद्दलची विचारधारणा किंवा विचारसरणी कशी आहे? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर देत त्याचा रागही व्यक्त केला.

"मला वाटतं का प्रत्येकजण आपआपल्या लोकांची बाजू घेतो, जर गटबाजी नसेल आणि इंडस्ट्री खूीप प्रामाणिक झाली तर अभिनेत्यांची अर्धी दुकान बंद होतील. पण आता गोष्टी चांगल्या होत आहेत. प्रेक्षक आता अधिक हुशार झालाय त्यामुळे चांगला आशय असलेल्या सिनेमांना चांगले दिवस आले आहेत", असं करण म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आपल्याला नवीन प्रकारचे सिनेमा पाहायचे आहेत. मात्र, तरी सुद्धा आपल्याला तेच जुने कलाकार हवे आहेत. त्यामुळे जर नवीन प्रकारचे सिनेमा पाहायचे असतील तर नवीन कलाकारांनाही संधी दिली पाहिजे. तेच जुने चेहरे आजही काम करतायेत. त्यांच्या जागी आता नवीन अभिनेतेसुद्धा दिसायला हवेत."

इंडस्ट्रीतल्या लोकांना आजही असं वाटतं की हा टीव्ही स्टार आहे आणि मोठ्या पडद्यावर काम करणार नाही. इंडस्ट्रीची ही बंदिस्त विचारसरणी बदलली पाहिजे. यामुळे खूप त्रास होतो.गेल्या सहा वर्षांपासून टीव्हीवर एक टॉप शो चालवणारा तो टेलिव्हिजनचा चेहरा असेल, तर तो तुमच्या फिल्म स्टारपेक्षा जास्त लोकप्रिय आणि मार्केटेबल आहे, असंही करण म्हणाला.

दरम्यान, करण लवकरच डरन छू या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाची निर्मिती करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव करत आहे. आशुतोष राणा यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा १३ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे.