Kareena Kapoor pays more taxes than Shahid Kapoor, Katrina Kaif and Kiara Advani
शाहिद कपूरपेक्षा जास्त टॅक्स भरते करीना कपूर, कतरिना कैफ अन् कियारालाही सोडलं मागे By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:18 PM2024-09-05T15:18:40+5:302024-09-05T15:34:49+5:30Join usJoin usNext करीना कपूर ही कमाईतील एक मोठा हिस्सा कर म्हणून भरते. बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. ती कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. करीना कपूरचं नाव आता भारतातील सर्वाधिक करदात्यांच्या यादीत सामील झालं आहे. एवढंच नाही तर करीना ही शाहिद कपूर, कतरिना कैफ आणि कियारा आडवाणी यांच्यापेक्षाही जास्त कर भरते. शाहीदने यंदा १४ कोटी तर कतरिनाने ११ कोटी कर भरला आहे. कियारा आडवाणी हिने १२ कोटी कर भरला. मीडिया रिपोर्टनुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात करीनाने सुमारे २० कोटी रुपये टॅक्स भरला आहे. करीन कपूरची तगडी कमाई होते. आज ती बी टाऊनची टॉप अभिनेत्री आहे. करिनाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून बी-टाऊनवर राज्य केलं आहे. कपूर घराण्याची मुलगी आणि पतौडी घराण्याची सून करीना कपूर खान हिने केवळ प्रसिद्धीच नाही तर चित्रपटांमधूनही भरपूर पैसा कमावलाय. आज ही अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. CNBC TV 18 च्या रिपोर्टनुसार, करीना कपूर खानची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, करीना तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये मानधन घेते. ती प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी पाच कोटी रुपये घेते. झूमनुसार, तिची वार्षिक कमाई 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूरकतरिना कैफकियारा अडवाणीसेलिब्रिटीबॉलिवूडKareena KapoorShahid KapoorKatrina KaifKiara AdvaniCelebritybollywood