करीना कपूरला सैफसोबत लग्न न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्री म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:27 AM 2024-04-22T10:27:15+5:30 2024-04-22T10:36:18+5:30
Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूरने सांगितले की, जेव्हा लोकांना समजलं की, तिने सैफ अली खानसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा काहींनी तिला त्याच्यासोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खानने 'कभी खुशी कभी गम', 'ऐतराज', 'ओंकारा', 'जब वी मेट', 'रा.वन', '3 इडियट्स' आणि 'उडता पंजाब' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून अभिनय कौशल्य दाखवले आहे. ती प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.
अभिनेता सैफ अली खानसोबत ती आनंदी वैवाहिक जीवन व्यतित करते आहे. त्यांना तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान ही दोन मुले आहेत. करीनाने खुलासा केला की, जेव्हा तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकांनी तिला सैफ अली खानशी लग्न न करण्याचा सल्ला दिला.
करीना कपूरने सांगितले की, जेव्हा लोकांना समजले की, तिने सैफ अली खानसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा काही लोकांनी मला सैफ अली खानसोबत लग्न करू नको असा सल्ला दिला. मात्र तिने कोणाचंच ऐकलं नाही. तिला जे योग्य वाटलं तेच केलं.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत करीनाने सांगितले की, लोकांनी तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. लग्न करू नकोस. नंतर सगळं संपेल. मात्र बेबोने कोणाचंच ऐकलं नाही.
ती पुढे म्हणाली की, लोकांना कोणतीही गोष्ट तेव्हा करायची असते जेव्हा त्यांचं मन करते. मात्र मी ठरविले होते की, पुढे काहीही होईल, ते बघून घेईन. भलेही काम नाही मिळेल पण तिला लग्न करायचे होते आणि तिने केले.
शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीनाचे टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अली खानसोबत जवळीकता वाढली. त्यानंतर २०१२ साली तिने सैफसोबत लग्न केले.
करीना कपूरने सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर सिनेमात मोठे रोल करण्यासाठी नकार दिला होता. तिला जास्त वेळ विवाहित आयुष्यासाठी द्यायचे होते. या दरम्यान तिने तलाश, सत्याग्रह, सिंघम रिटर्न, बजरंगी भाईजानसारख्या सिनेमात काम केले. यात तिच्या मोठ्या भूमिका नव्हत्या.
करीना लाल सिंग चड्ढानंतर क्रू सिनेमात झळकली. यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालंय