गरोदरपणात करिश्मा कपूरचा नवरा आणि सासूने केला होता छळ; अभिनेत्रीने भोगलाय कौटुंबिक हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 12:59 PM2023-07-04T12:59:17+5:302023-07-04T13:21:40+5:30

निळ्या डोळ्यांची अभिनेत्री करिश्मा कपूरची जादू आजही कायम आहे. ९० च्या तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले. गोविंदा, सलमान खान यांच्यासोबत तिची जोडी तुफान गाजली. मात्र करिश्माने खऱ्या आयुष्यात बरंच काही सहन केलं आहे हे खूप कमी जणांना माहितीय.

९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. आजवरच्या कारकिर्दीत करिश्माने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.

करिश्मा कपूर वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. प्रोफेशनल आयुष्यात तिने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले मात्र खाजगी आयुष्यात तिला दु:ख सोसावं लागलं.

यशाच्या शिखरावर असतानाच करिश्माचं उद्योगपती संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) लग्न झालं. मात्र काही वर्षांनी करिश्मा संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आणि तिने घटस्फोट घेतला.

2003 मध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरने बिझनेसमन संजयसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नातून करिश्माला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे.

मात्र लग्नाच्या ११ वर्षांनी २०१४ मध्ये दोघेही विभक्त झाले.

घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते. करिश्माने संजय आणि त्याची आई राणी यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

करिश्मा गरोदर असताना सासूने तिचा छळ केल्याचं तिने याचिकेत म्हटलं होतं.

संजयने त्याच्या आईला करिश्माच्या कानाखाली मारायले सांगितले. लग्नाच्या काही वर्षातच असा छळ होऊ लागल्याने करिश्माने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

करिश्माने असेही म्हटले होते की, संजयचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची आई त्याला या सगळ्यात साथ देत असे.

करिश्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने दुसरं लग्न केलं. तर करिश्मा आजही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.