आठ भाऊ-बहिणी आणि घटस्फोटीत आई, वडिलांशिवाय असं गेलं Katrina Kaif चं बालपण By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 12:20 PM 2021-11-17T12:20:44+5:30 2021-11-17T12:35:41+5:30
Katrina Kaif : कतरिनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्या आईने तिचं जीवन लोकांचं भलं करण्यात सोपवली होती. ती बऱ्याच वर्षापासून आपल्या वडिलांच्या संपर्कात नव्हती. कतरिना कैफच्या फॅमिलीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यात आधीच विक्की कौशलसोबत कतरिना लग्ना करणार असल्याची न्यूज जोरात आहे. पण दोघांनीही अजून त्यांच्या लग्नाबाबत काहीच अधिकृतपणे सांगितलेलं नाही. लग्नाच्या या चर्चेत कतरिना आणि तिच्या फॅमिलीबाबतही चर्चा होत आहे. चला आम्हीही तुम्हाला सांगणार आहोत कतरिनाच्या फॅमिलीबाबत काही खास गोष्टी ज्या तुम्ही कधी वाचल्या किंवा ऐकल्या नसतील.
कतरिना कैफ आठ भाऊ-बहिणींमध्ये मधली बहीण आहे. सुरूवात बर्थप्लेसपासून करूया. कतरिनाचा जन्म १६ जुलै १९८३ मध्ये हॉंगकॉंगमध्ये झाला होता. तिचे वडील मोहम्मद कैफ एक काश्मीरी वंशाचे ब्रिटीश बिझनेसमॅन आहे आणि आई Suzanne Turquotte इंग्लिश लॉयर आणि चॅरिटी वर्करर आहे.
कतरिनाला तीन मोठ्या बहिणी स्टीफनी, क्रिस्टीन आणि नताशा, एक मोठा भाऊ मायकल तर तीन लहान बहिणी मेलिसा, सोनिया आणि इसाबेल असा परिवार आहे.
कतरिना जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. अशात तिच्या आईने एकटीने इतक्या मोठ्या परिवाराचा सांभाळ केला आणि सर्वांना लहानाचं मोठं केलं. आईनेही आपल्या मुलांना कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.
कतरिनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्या आईने तिचं जीवन लोकांचं भलं करण्यात सोपवली होती. ती बऱ्याच वर्षापासून आपल्या वडिलांच्या संपर्कात नव्हती.
कतरिनाचं शिक्षण फारच इंटरेस्टींग होतं. तिचं आणि तिच्या भाऊ-बहिणींचं शिक्षण घरीच झालं होतं. कारण तिच्या आईला कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागत होतं. हॉंगकॉंगमध्ये जन्म झाल्यावर ते चीनमध्ये गेले, मग जपान, फ्रान्स, स्वित्झर्लॅंड आणि काही यूरोपियन देशात गेले होते.
कतरिनाचं बालपण पोलॅंड, बेल्जिअम, हवाईमध्ये गेलं. ज्यानंतर ती लंडनमध्ये आली. लंडनमध्ये तीन वर्षे राहिल्यानंतर ती भारतात आली. भारतात तिला कामाच्या ऑफर्स मिळाल्या, ज्यामुळे ती इथे शिफ्ट झाली आणि तेव्हापासून भारत हा तिचा पत्ता ठरला.
कतरिनाने भारतात आल्यावर आपलं सरनेम बदललं होतं. तिचं आधीचं नाव आईच्या नावावर Katrina Turquotte होतं. भारतात आल्यावर तिने ते बदलून Katrina Kaif केलं. अभिनेत्रीनुसार, तिने असं केलं कारण लोकांना कैफ म्हणणं Turquott च्या तुलनेत जास्त सोपं होतं.
२००३ मध्ये बॉलिवूड डेब्यूनंतर कतरिना भारतात सेटल झाली. तिला आता भारतात राहून १८ वर्षे झाले आहेत. आज तिला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आज ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.