'या' गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल येणार, पहिल्या भागाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:48 PM2024-10-10T16:48:00+5:302024-10-10T16:58:46+5:30

प्रेक्षकांच्या कायम स्मरणात असणाऱ्या या गाजलेल्या सिनेमाचा येणार सीक्वल. पहिल्या भाग झालेला प्रचंड यशस्वी

हा फोटो पाहून सिनेमा कोणता याचा अंदाज आला का तुम्हाला. या सिनेमात अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती

या सिनेमाचं नाव आहे 'खोसला का घोसला'. या सिनेमात अनुपम खेर, रणवीर शोरे, बोमन इराणी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती

'खोसला का घोसला' या गाजलेल्या सिनेमाच्या पुढील भागाची तयारी सुरु आहे. हो तुुम्ही बरोबर वाचताय.

प्रेक्षकाना खळखळून हसवणाऱ्या आणि कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवणाऱ्या 'खोसला का घोसला'चा पुढील भाग लवकरच भेटीला येणार आहे

'खोसला का घोसला'मधील कलाकार रणवीर शोरेने याविषयी सांगितलं आहे. सध्या तरी सिनेमाच्या सीक्वलची तयारी प्राथमिक स्तरावर सुरु आहे

पहिल्या भागात खोसला कुटुंबाच्या मालकीची जमीन एक बिल्डर हडपतो. ती जमीन स्वतःची आहे असा दावा करत त्या जमिनीवर कब्जा करतो

पुढे खोसला कुटुंब स्वतःच्या मालकीची जमीन हुशारीने त्या बिल्डरकडून कशी मिळवतात याची रंजक कहाणी 'खोसला का घोसला'मध्ये बघायला मिळालेली. आता दुसऱ्या भागात काय असणार याची उत्सुकता आहे.