प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लग्नाच्या ३ वर्षांनी होणार आई, हटके मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:53 AM2024-09-19T11:53:31+5:302024-09-19T12:04:02+5:30

टीव्ही अभिनेत्रीने लग्नाच्या ३ वर्षांनी दिली गुडन्यूज, मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वीच 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने आई होणार असल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. आता कुंडली भाग्य मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या आणखी एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे.

श्रद्धा आर्या पाठोपाठ 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री सना सय्यदने आई होणार असल्याचं सांगितलं आहे. लग्नानंतर ३ वर्षांनी सनाच्या घरी पाळणार हलणार आहे.

सनाने नुकतंच मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

सनाने मॅटर्निटी फोटोशूटमध्ये पतीबरोबर रोमँटिक पोझ दिल्या आहेत. काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

सनाने फोटोशूटसाठी खास पोझही दिल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने बेबी बंपही फ्लाँट केल्याचं पाहायला मिळत आहे.

निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये सना आणि तिचा पती इमादने ट्विनिंग करत हटके मॅटर्निटी शूट केलं आहे.

या फोटोंमध्ये सनाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत आहे. सना आणि इमादने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता ते आईबाबा होणार आहेत.