लेजा-लेजा रे महकी रात में... पांढऱ्या ड्रेसमध्ये ध्वनी भानुशाली दिसतेय भलतीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 03:36 PM2024-12-01T15:36:30+5:302024-12-01T15:43:37+5:30

ध्वनीचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ध्वनी भानुशाली हिनं अतिशय कमी वयात तिच्या मधुर आवाजानं आणि गाण्याच्या शैलीमुळे संगीत विश्वामध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.

ध्वनी लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावर देखील तिचे लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत.

ध्वनीचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ध्वनीने परिधान केलेल्या व्हाईट ड्रेसने लक्ष वेधून घेतलं आहे.

पुन्हा एकदा ध्वनीचे सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. या फोटोमध्ये ती अगदी क्लासी आणि हॉट दिसतेय.

तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.

ध्वनीनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तसेच तिचे काही अल्बमही प्रदर्शित झाले आहेत.

ध्वनीची गाणी युट्युबवरही खूप लोकप्रिय आहेत. तिच्या गाण्यांना विक्रमी व्ह्युअर्स आहेत. ध्वनि ही सर्वाधिक ह्युज मिळवणारी सर्वात कमी वयाची गायिका आहे. ध्वनीचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे.

एक गायिका म्हणून ध्वनिनं 2017 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिनं बद्रीनाथ की दुल्हनिया चित्रपटातील हमसफर हे गाणे फिमेल व्हर्जनमध्ये म्हटले होते.

ध्वनीनं गायलेल्या वास्ते हे गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. त्याचा समावेश ग्लोबल टॉप १०० व्हिडिओंमध्ये झाला आहे.

अवघ्या २१ व्या वर्षी ध्वनीनं हा इतिहास रचला. हा इतिहास रचणारी पहिली भारतीय गायिका ठरली.