हातात दारूचा ग्लास अन् भलताच बोल्ड स्वॅग, कल्याणची चुलबुली शिवालीच्या हॉट फोटोंनी केला कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 03:39 PM2024-07-31T15:39:38+5:302024-07-31T15:45:56+5:30

डोळ्यावर गॉगल आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन शिवालीने हे फोटोशूट केलं आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. याच शोमधून कल्याणची चुलबुली शिवाली परब घराघरात पोहोचली.

अभिनयाबरोबरच शिवाली तिच्या सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतंच शिवालीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोंमध्ये शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. हाय स्लिट ड्रेसमध्ये शिवालीने हे फोटोशूट केलं आहे.

फोटोसाठी तिने पोझही दिल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या या हॉट अदांनी चाहत्यांचं लक्षही वेधून घेतलं आहे.

डोळ्यावर गॉगल आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन शिवालीने हे फोटोशूट केलं आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

शिवालीच्या मादक अदा पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

शिवालीने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. प्रेम प्रथा धुमशान या सिनेमातही ती दिसली होती.