बॉलिवूड अभिनेता नाही तर हा आपला निखिल बने! फोटो पाहून म्हणाल- "भावा विषय End"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:01 PM2024-06-04T13:01:53+5:302024-06-04T13:08:55+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं हटके फोटोशूट, फोटो पाहून चाहते अवाक्

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. याच संधीचं सोनं करून अभिनेता निखिल बने घराघरात पोहोचला.

उत्तम अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर निखिलने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं. बने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स बने पोस्टद्वारे चाहत्यांना देत असतो. नुकतेच त्याने हटके फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो निखिल बनेने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बनेचा रुबाबदार लूक पाहायला मिळत आहे.

जीन्स, टीशर्ट आणि त्यावर डिझायनर जॅकेट बनेने घातलं आहे. डोळ्यावर चष्मा आणि पायात शूज घालून बने राऊडी लूक केला आहे.

त्याचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. बनेचा हा लूक एका बॉलिवूड अभिनेत्यासारखा वाटत आहे.

त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "विषय आता सुरू झालाय वेड्या", अशी कमेंट अभिनेत्री हेमांगी कवीने केली आहे.

"विषय हार्ड", "पहिल्या फोटो बघितल्यावर वाटलं की निलेश साबळे...पण भावा एकदम भारी", "बने आज भी दिन बने" अशा कमेंट्सही केल्या आहेत.