५०० पेक्षा जास्त वेळा रिजेक्शनचा सामना; लोकांनी मारले टोमणे, आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 02:38 PM2024-07-16T14:38:16+5:302024-07-16T14:53:54+5:30

करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली असेल, पण आज तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने नाव कमावणारी अभिनेत्री महिमा मकवाना सध्या इमरान हाश्मी स्टारर 'शोटाइम' या वेब सीरिजमध्ये दिसत आहे.

महिमाने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली असेल, पण आज तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीने खूप संघर्ष केला आहे.

महिमा मकवानाने लहानपणीच वडील गमावले. महिमाच्या आईने काम करून आपल्या मुलांना वाढवलं. एका मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला आहे की तिची आई देखील खूप कष्ट घ्यायची.

घरची परिस्थिती चांगली नव्हती त्यांचे संपूर्ण कुटुंब एका चाळीत राहत होतं. महिमाने सांगितलं की, अभिनेत्री होण्याचं तिचं स्वप्न होतं, या काळात तिने तिच्या मार्गात अनेक चढउतार पाहिले.

या अडचणींमध्येही महिमा मकवानाच्या आईने आपल्या मुलीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. जेव्हा महिमाने या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मुलाखती दिल्या तेव्हा तिला ५०० पेक्षा जास्त वेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला.

अभिनेत्रीला लोकांकडून टोमणे ऐकावे लागले की, ती हे करू शकणार नाही. पण महिमाने हार मानली नाही आणि अनेक वेळा काम करण्यासाठी संघर्ष केला. यानंतर, वयाच्या दहाव्या वर्षी महिमाने बालकलाकार म्हणून काम केलं.

२००८ मध्ये 'मोहे रंग दे' या मालिकेत ही अभिनेत्री दिसली होती. यानंतर महिमा मकवानाने सपने सुहाने लडकपन या मालिकेतून टीव्हीवर लीड अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. यानंतर अनेक शोमध्ये काम केले.

टीव्ही जगतात आपला ठसा उमटवल्यानंतर या अभिनेत्रीने सलमान खानच्या 'अंतिम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सध्या महिमा मकवाना बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी स्टारर वेब सीरिज 'शोटाईम'मध्ये प्रसिद्ध आहे.