Malaika Arora : ब्रेकअप के बाद! मालदीव्सला गेली मलायका, नेटकरी म्हणाले- "अर्जुन कुठे आहे?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:22 AM2024-08-08T11:22:54+5:302024-08-08T11:26:33+5:30

अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानच आता मलायका मालदीव्समध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल...पण, गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मलायका आणि अर्जुन दोघांनी याबाबत क्रिप्टिक पोस्टही शेअर केल्या होत्या. पण, ब्रेकअपबाबत उघडपणे बोलणं त्या दोघांनीही टाळलं होतं.

अशातच मलायकाला मिस्ट्री मॅनबरोबर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानच आता मलायका मालदीव्समध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मालदीव्स व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

फोटोमध्ये मलायका बाथरोब ड्रेसमध्ये समुद्रकिनारी बसून एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अर्जुन कपूर असं लिहिलं आहे. अनेकांनी "अर्जुन कपूर कुठे आहे?" असंदेखील विचारलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसायचे.