वेड लागले प्रेमाचे! बायकोबरोबर रोमँटिक झाला परबांचा प्रथमेश, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:35 PM2024-08-01T15:35:14+5:302024-08-01T15:39:53+5:30

प्रथमेशचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच प्रथमेशने पत्नी क्षितीजासह पावसात भिजत रोमँटिक फोटोशूट केलं आहे.

प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'टाइमपास' या सिनेमाने त्याला ओळख मिळवून दिली. दगडूची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला.

प्रथमेशचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच प्रथमेशने पत्नी क्षितीजासह पावसात भिजत रोमँटिक फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रथमेश पत्नीबरोबर रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

"चित्रपटामध्ये, On screen अनुभवलेला पाऊस आणि real life मध्ये माझ्या real heroin सोबत अनुभवलेला पाऊस कमालीचा वेगळा आणि विलक्षण होता", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

प्रथमेश आणि क्षितीजाचे हे रोमँटिक फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यांनी केला आहे.

प्रथमेशने सोशल मीडियावरच त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

प्रथमेश आणि क्षितीजा सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात.