IN PICS : ...म्हणून हे मराठी कलाकार नावापुढे आडनाव लावत नाही, जाणून घ्या का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:37 PM2023-03-15T17:37:45+5:302023-03-15T17:51:36+5:30

Marathi Actors : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार नावापुढे आडनाव लावत नाही. काय आहेत या कलाकारांची आडनावं?

मराठीतील गुणी अभिनेत्री अमृता सुभाष नावामागे आडनाव लावत नाही. हिचं खरं आडनाव तुम्हाला माहित आहे का? लग्नाआधी अमृताचं नाव अमृता ढेंबरे असं होतं. लग्नानंतर अमृता संदेश कुलकर्णी असं तिचं पूर्ण नाव आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली रसिका सुनील हिला सगळेच ओळखतात. तिच्या नावातील सुनील हे तिच्या वडिलांचं नाव आहे. तिचं पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असे आहे. एवढं मोठं आडनाव न लावता रसिकाने रसिका सुनील असं सुटसुटीत नाव स्वीकारलं.

गोड चेहऱ्याची ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव ही सुद्धा आपल्या नावापुढे फक्त वडिलांचं नाव लावते. सायली संजीव चांदसारकर असं तिचं पूर्ण नाव आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर याचं पूर्ण नाव काय? तर ललित प्रभाकर भदाणे. भदाणे हे आडनाव न लावता ललितने ललित प्रभाकर हे नाव स्वीकारलं.

‘मैने प्यार किया’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झालेली भाग्यश्रीचे खरे नाव आहे भाग्यश्री पटवर्धन. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची वंशज असलेल्या भाग्यश्रीचं लग्नानंतरच नाव भाग्यश्री दासानी असं आहे.

तेजस्वी प्रकाश या मराठमोळ्या अभिनेत्रीने बिग बॉस १५ चं विजेतेपद पटकावलं. तेजस्वी प्रकाशचं खरं नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असं आहे.

महाराष्ट्रीची हास्यजत्रा या सुपरहिट शोमधून लोकप्रिय झालेला पृथ्वीक प्रताप याचं पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे असं आहे.

मुलगी झाली हो या लोकप्रिय मराठी मालिकेत माऊची भूमिका साकारणारी दिव्या सुभाष हिचं पूर्ण नाव दिव्या पुगावकर आहे.

राधा सागर ही आई कुठे काय करते या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणाऱ्या राधा सागरचं पूर्ण नाव राधा कुलकर्णी असं आहे. मात्र ती नवऱ्याचं फक्त सागर हे नाव लावते.

आपल्या सुरेल स्वरांनी चाहत्यांना वेड लावणारे अजय-अतुल हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचं पूर्ण नाव अजय गोगावले आणि अतुल गोगावले असं आहे. मात्र आडनाव न लावता ही जोडी अजय-अतुल नावाने लोकप्रिय झाली.