Amruta Khanvilkar: फॅशन अन् सौंदर्याची बातच न्यारी, अमू दिसतेय जणू गुलाबी परी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:33 PM2024-07-25T17:33:11+5:302024-07-25T17:36:11+5:30

गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट आणि टॉपमध्ये अमृताने फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अमृता जणू एखाद्या परीसारखीच भासत आहे.

अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाची छाप पाडली.

सध्या अमृता 'ड्रामा ज्युनियर्स' या झी मराठीवरील रिएलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोसाठी अमृताने खास लूक केला होता.

गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट आणि टॉपमध्ये अमृताने फोटोशूट केलं आहे. केसांचा बन बांधून तिने ग्लॅमरस लूक केला आहे.

फोटोसोठी अमृताने खास पोझही दिल्या आहेत. या फोटोंमध्ये अमृता जणू एखाद्या परीसारखीच भासत आहे.

अमृताचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्रीबरोबरच अमृता एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे. "वाजले की बारा" या लावणीमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. 'चंद्रमुखी' सिनेमातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.