थाटात पार पडलं वहिनीसाहेबांच्या 'राजकुमारा'चं बोरन्हाण; फोटो पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:45 PM2022-01-26T17:45:35+5:302022-01-26T17:53:16+5:30

धनश्रीनं तिच्या बाळाचं नाव कबीर असं ठेवलं आहे. अनेकदा ती त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली नंदीता म्हणजेच छोट्या पडद्यावरच्या वहिनीसाहेब अर्थातच अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले ग्लॅमरस फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

२९ जानेवारी २०२१ रोजी धनश्रीच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं. यानंतर तिनं ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली होती.

तिनं आपल्या बाळाच्या बारशाचेही फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. धनश्रीनं आपल्या बाळाचं नाव 'कबीर' असं ठेवलंय.

नुकतीचं 'कबीर'चं बोरन्हाण पार पडलं. धनश्रीनं तिच्या मुलाच्या बोरन्हाणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळत आहे.

खास बोरन्हाणासाठी कबीरने काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी बोरं, हरभरा, चॉकलेटसोबत कबीर खेळत असतांना त्याच्या बाललिलाही पाहायला मिळाल्या.

गेल्या वर्षी धनश्रीनं एक खास व्हिडीओ शेअर करत गरोदर असल्याची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिनं आपल्या पतीच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही गोड बातमी शेअर केली होती.