मराठमोळ्या मानसी साळवीच्या मुलीला पाहिलंय का? मायलेकीच्या मलेशिया ट्रीपचे Photos पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 12:52 PM2024-06-07T12:52:40+5:302024-06-07T13:12:47+5:30

मानसीच्या ग्लॅमरस फोटोंवरुन नजरच हटत नाही. तिच्या लेकीचं नावही खूपच युनिक आहे.

मराठमोळी अभिनेत्री मानसी साळवीच्या (Manasi Salvi) सौंदर्यावर प्रेक्षक फिदा आहेत. वयाच्या 44 व्या वर्षीही तिचा कमालीचा फिटनेस पाहून चाहते प्रेरित होतात.

गेल्या २० हून अधिक वर्षांपासून मानसी सिनेइंडस्ट्रीत काम करत आहे. मराठी सिनेमा, हिंदी मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

मानसीने अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. 'कोई अपना सा','प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या तिच्या गाजलेल्या मालिका. शिवाय ती नुकतीच 'गुम है किसी के प्यार मे' मालिकेतही झळकली.

मानसी साळवीने 2005 साली दिग्दर्शक हेमंत प्रभूशी लग्न केले. 'सती:सत्या की शक्ती' मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. मात्र लग्नाच्या ११ वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.

मानसीने २००८ साली एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव ओमिषा प्रभू. सध्या मानसीचे लेकीसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. मानसीची लेकही आईसारखीच दिसायला सुंदर आहे.

ओमिषा नुकतीच दहावीची परीक्षा पास झाली. यानंतर मायलेकी नुकत्याच मलेशियाला जाऊन एन्जॉय करुन आल्या. मानसीने लेकीसोबतचे मलेशियामध्ये फिरतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्येही मानसीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय तिच्या फोटोंवरुन नजरच हटत नाहीए. मलेशियाच्या लोकप्रिय ठिकाणांना भेट देत त्यांनी सुट्टी एन्जॉय केली.

मानसीने 'आई शप्पथ', 'खेळ मांडला', 'असा मी अशी ती' या मराठी सिनेमांमध्ये काम केलं. तर 'आभाळमाया','असंभव','एकाच ह्या जन्मी जणू' या मराठी मालिकांमध्ये काम केलं.