न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा स्टालयिश अंदाज, बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 06:21 PM2024-09-24T18:21:52+5:302024-09-24T18:26:56+5:30

सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम न्यू यॉर्कला गेली असून त्यांनी तिथे खास फोटोशूट केलंय

नम्रता संभेराव ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामुळे नम्रता संभेराव सर्वांच्या पसंतीस उतरली

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये नम्रताने साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. लॉली, पावली या नम्रताच्या भूमिका लोकांना खळखळून हसवतात

नम्रता संभेराव सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमसोबत न्यू यॉर्कला गेली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ची खास अमेरिका टूर या ठिकाणी आयोजित केली गेलीय

न्यू यॉर्कला गेल्यावर नम्रताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गँगसोबत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे. नम्रताच्या या फोटोशूटला चाहत्यांनीही पसंती दिली आहे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने खास डिझाईन केलेले कपडे परिधान करुन हटके फोटोशूट केलंय

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावच्या या फोटोशूटला चाहत्यांनीही चांगली पसंती दिलीय. नम्रता सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे

यावर्षी नम्रता संभेरावने अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत नाच गं घुमा सिनेमात अभिनय केला. या सिनेमात नम्रताने साकारलेली आशाताईंची भूमिका चांगलीच गाजली