पहिल्यांदाच समोर आले प्रार्थना बेहरेचे वडील; त्यांच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:01 PM2023-06-19T12:01:23+5:302023-06-19T12:07:06+5:30

Prarthana behere: प्रार्थनाने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर केला अन् नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रार्थनाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.

प्रार्थनाने मराठीसह हिंदी कलाविश्वातही काम केलं आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टीव्ह आहे.

आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या चाहत्यांसोबत जोडण्यासाठी ती सोशल मीडियाचा वापर करते.

इन्स्टाग्राम, फेसबुकवर ती कायम तिच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींचे अपडेट चाहत्यांना देत असते.

प्रार्थनाने नुकताच तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत त्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.

प्रार्थनाचे वडील अत्यंत साधे असून लोक त्यांच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

प्रार्थनाने यापूर्वी तिच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.