प्रार्थनाच्या सासूबाईंना कधी पाहिलंत का? सासू-सुनेचं आहे एकमेकींसोबत स्पेशल बॉण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:00 PM2024-05-13T13:00:00+5:302024-05-13T13:00:00+5:30

Prarthana behere : सासू असावी तर अशी! प्रार्थना बेहरेने पहिल्यांदाच शेअर केला सासूबाईंचा फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर बऱ्याच वर्षांनी पदार्पण केलं आणि ही मालिका लोकप्रिय ठरली.

प्रार्थनाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग तितका मोठा आहे.

प्रार्थना सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. ती कायम काही ना काही नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्रार्थनाच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या सासरच्या मंडळीविषयी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात.

प्रार्थना तिच्या नवऱ्यासोबत कायमच फोटो पोस्ट करत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या सासूबाईंसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

मदर्स डे निमित्त प्रार्थनाने तिच्या सासूसोबत फोटो शेअर केला. हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

प्रार्थनाच्या सासूबाईंचं नाव सरिता जावकर असं असून सोशल मीडियावर त्या कमालीच्या सक्रीय आहेत.