प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय खूपच क्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 01:00 PM2024-07-09T13:00:07+5:302024-07-09T13:28:51+5:30

प्रियदर्शिनीचे क्यूट फोटो अन् स्टायलिश पोज!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.

'फुलराणी' बनून मोठ्या पडद्यावर आलेली प्रियदर्शिनी मल्टिटॅलेंटेड आहे. कॉमेडी असो किंवा गंभीर कोणत्याही भूमिकेत ती एकदम उठून दिसते.

प्रियदर्शिनीचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. तिच्या फोटोशूटने ती कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतंच काळ्या वनपीसमध्ये तिने पोस्ट केलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

हातात फुलांचा गुच्छ, काळेभोर डोळे, बन करुन बांधलेले कुरळे केस, अशा लूकमध्ये तिचा हा फोटो खूपच सुंदर दिसतोय. याच तिची तीक्ष्ण नजर काळजाला भिडणारी आहे.

या क्यूट लूकमध्ये प्रियदर्शिनीने मस्त पोज दिल्या आहेत. निसर्गरम्य वातावरणात प्रियदर्शिनीने हे फोटोशूट केलं आहे.

प्रियदर्शिनीने परिधान केलेल्या या काळ्या वनपीसला पारंपरिक टच आहे. ड्रेसच्या मागच्या बाजूला महिलेच्या चित्राची डिझाईन आहे. तिचा हा हटके ड्रेस तरुणींच्या पसंतीस पडला आहे.

"जेव्हा खास दिवशी भारतीय महिलेला काहीतरी बोल्ड परिधान करायचं असतं. काहीतरी ग्लॅमरस. काहीतरी क्लासी पण सेक्सी. काहीतरी भारतीय. " असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

प्रियदर्शिनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून तर प्रेक्षकांना हसवतच आहे. शिवाय तिने २ मराठी सिनेमांमध्ये मुख्य भूमिकाही साकारली आहे. मल्टिटॅलेंटेड प्रियदर्शिनीचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे.