'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री गेली आई एकविरा देवीच्या दर्शनाला, म्हणते- "आगरी कोळ्यांची माऊली..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:38 PM2024-07-30T16:38:07+5:302024-07-30T16:41:51+5:30

साडी नेसून पारंपरिक पेहराव करत रुचिरा एकविरा देवीच्या दर्शनाला गेली होती. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आहे. रुचिरा बाबू या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

'बाबू' सिनेमाच्या टीमने नुकतंच आई एकविरा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी रुचिरा जाधवही उपस्थित होती.

साडी नेसून पारंपरिक पेहराव करत रुचिरा एकविरा देवीच्या दर्शनाला गेली होती. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

"आई माऊलीचा उदो उदो…पहिला आगरी-कोळी चित्रपट “बाबू” आणि आगरी कोळ्यांची माऊली एकवीरा आई…आई, तुझा आशिर्वाद राहूदे गं माऊली...", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रुचिराचा 'बाबू' सिनेमा येत्या २ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे. अस्सल आगरी कोळी भाषेतला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'मुळे ती चर्चेत आली होती. आता ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.