आदर्श शिंदेची पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री; अनेक एकांकिकांमध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:56 PM2022-07-18T12:56:20+5:302022-07-18T13:02:26+5:30

Adarsh shinde wife: नेहाचं पूर्वाश्रमीचं नाव नेहा अरविंद लेले असं आहे. त्यानंतर आदर्शसोबत लग्न करुन ती शिंदे कुटुंबाचा भाग झाली.

मराठी कलाविश्वात शिंदेशाहीचा दबदबा असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. शिंदे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

प्रल्हाद शिंदे ते आदर्श शिंदे यांच्यापर्यंत या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संगीत क्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे. त्यामुळेच आज या कुटुंबातील काही महत्त्वाच्या सदस्यांविषयी जाणून घेऊयात.

मराठी कलाविश्वाला ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘सुन्या सुन्या’, ‘अंबे कृपा करी’ यांसारखी सुपरहिट गाणी देणारा प्रसिद्ध गायक म्हणजे आदर्श शिंदे.

आपल्या आवाजामुळे कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या आदर्शच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्यांना माहित आहे.

आज आपण आदर्शच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात. आदर्शच्या पत्नीचं नाव नेहा असं असून ती देखील त्याच्याप्रमाणेच गायिका आणि अभिनेत्री आहे.

नेहा आणि आदर्शचं लव्हमॅरेज असून त्यांची पहिली भेट कॉलेजमध्ये असताना झाली.

नेहाचं पूर्वाश्रमीचं नाव नेहा अरविंद लेले असं आहे. त्यानंतर आदर्शसोबत लग्न करुन ती शिंदे कुटुंबाचा भाग झाली.

नेहा उत्तम गायिका असण्यासोबतच अभिनेत्रीही आहे. तिने कॉलेज जीवनात अनेक एकांकिकांमध्ये काम केलं आहे.

नेहा वडाळ्यात लहानाची मोठी झाली असून सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.