PHOTO: गुलाबी पैठणी अन् अक्षयाचं घायाळ करणारं सौंदर्य; मनमोहक लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 05:41 PM2024-08-13T17:41:04+5:302024-08-13T17:47:01+5:30

अलिकडेच अभिनेत्री अक्षया गुरव 'डंका' चित्रपटामुळे चर्चेत आली होती.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने साकारलेलं माया नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.

अक्षया गुरव मराठी मालिकाविश्वातील एक नावाजलेली नायिका आहे.

'मानसीचा चित्रकार तो', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'लव्ह लगन लोचा' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

दमदार अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांना आपलंस केलं.

नुकतेच अक्षयाने सोशल मीडियावर गुलाबी पैठणी नेसून सुंदर फोटो शेअर केले आहेत.

फोटोंंमध्ये गुलाबी साडी त्यावर साजेशी नाकात नथ, कानात झुमके तसेच मोकळे केस असा अभिनेत्रीचा लूक पाहायला मिळतो आहे.

अक्षयाचे हे व्हायरल फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.