तुझ्या इश्काचा नादखुळा...! अभिनेत्री अक्षया हिंदळकरच्या ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:53 IST2024-10-09T17:41:38+5:302024-10-09T17:53:18+5:30

'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकरचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

छोट्या पडद्यावरील 'तुझ्या इश्काचा नाद खुळा' या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया हिंदळकर प्रसिद्धीझोतात आली.

अक्षया सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे कायमच लाइमलाइटमध्ये येते.

अलिकडेच तिने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून काही खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

'झी मराठी अवॉर्ड २०२४' च्या नॉमिनेशन पार्टीसाठी अक्षयाने केलेल्या या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

या फोटोंमधील तिचा ग्लॅमरस लूक पाहून नेटकरी तिला 'बार्बी' म्हणत आहेत.

नारंगी रंगाच्या स्टाईलिश ड्रेसमध्ये हटके पोज देत अक्षयाने हे फोटो क्लिक केल्याचे पाहायला मिळत आहेत.

अक्षया हिंदळकरच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.