उफ तेरी अदा! नवज्योतसिंग सिद्धूच्या लेकीनं लावलं 'वेड'; राबियाचं Hot & Bold फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:11 PM2023-01-30T18:11:07+5:302023-01-30T18:13:34+5:30

Navjot Singh Sidhu's daughter Rabia's Hot & Bold photo नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया सिंग हिचे सौंदर्य बॉलिवूड अभिनेंत्रींना लाजवेल असे आहे.

नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया सिंग हिचे सौंदर्य बॉलिवूड अभिनेंत्रींना लाजवेल असे आहे. ती 21 वर्षांची आहे

राबिया आईला सर्वात जवळची मैत्रिण मानते. काही वर्षांपूर्वी ती वडिलांसोबत ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये आली होती. यावेळी तिने कुटुंबाबद्दल अनेक खुलासे केले होते.

पार्टी आणि फॅशन हे दोन राबियाचे आवडते छंद आहेत. याचमुळे फॅशन डिझाईनर बनण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

राबिया सिद्धू ही इंटरनेट सेंन्सेशन आहे. इन्स्टावर तिचे 70 हजार फॉलोअर्स आहेत. ती नेहमी या अकाऊंटवर नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

राबियाने पंजाबच्या पटियालामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स सिंगापूर आणि लंडन येथून पूर्ण केला आहे.

सिंगापुर येथील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केल्यानंतर सध्या ती लंडनमध्ये फॅशन डिझाईनिंगमध्ये मास्टर डिग्री घेत आहे.

राबियाचे तिच्या शाळेतील मित्रासोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. इशान सुरी असे त्याचे नाव आहे. दोघांनीही सिंगापूरला एकत्रच शिक्षण घेतले आहे.

राबिया ही सोशल मीडियावर प्रसिद्ध हस्ती आहे. तिचे फोटो इन्स्टा आणि अन्य ठिकाणी लोकांचे लक्ष खेचून घेतात. राबिया उद्या बॉलिवूडमध्ये आली तर नवल वाटायला नको.

स्टार किड्सप्रमाणे तिचेही मोठे फॅन फॉलोव्हर्स आहेत. ती रोज स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.