'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक; लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 04:05 PM2024-08-10T16:05:38+5:302024-08-10T16:15:23+5:30

झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

मालिकेतील अभिराम जहागीरदार आणि लीला यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते आहे.

अभिनेत्री वल्लरी विराजने मालिकेत साकारलेलं 'लीला' नावाचं पात्र चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

दरम्यान, वल्लरी विराज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेत तिने काम केलं आहे.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये वल्लरीचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या मालिकेत तिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तसंच 'कन्नी' या मराठी सिनेमातही ती झळकली आहे.