Taapsee Pannu : मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू; वाटले पंखे आणि कूलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 14:57 IST2025-04-13T14:51:52+5:302025-04-13T14:57:35+5:30

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू या तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली आहे.

तापमानात दिवसागणिक वाढ होत आहे. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू या तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली आहे.

उन्हाने हैराण झालेल्या अनेक गरीब कुटुंबांना तापसीने पंखे आणि वॉटर कूलरचं वाटप केलं आहे. झोपडपट्टीमध्ये जाऊन तिने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणला.

हेमकुंट फाउंडेशनसोबत तापसी पन्नूने हे चांगलं काम करण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर लोक तिला रिअल हिरो, देवदूत म्हणत आहेत.

अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती लोकांना मदत करताना दिसत आहे.

"आपण अनेकदा पंखे किंवा कूलरसारख्या मूलभूत सुविधांना गृहीत धरतो, परंतु अनेक लोकांसाठी, विशेषतः या असह्य उष्णतेमध्ये वाऱ्याची हलकीशी झुळूक देखील एक वरदान आहे."

"या उपक्रमाने मी प्रभावित झाले आहे आणि त्याचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. हे फक्त एखादी गोष्ट देण्याबद्दल नाही."

"लोकांच्या पाठीशी उभं राहण्याबद्दल, त्यांच्या वेदना समजून घेण्याबद्दल आणि त्या कमी करण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते करण्याबद्दल आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

तापसीचे हे फोटो पाहून युजर्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. तापसी तू खरोखरच खरी हिरो आहेस, तू लोकांसाठी देवदूत बनून आली आहेस असं युजर्स म्हणत आहेत.

तापसी पन्नूच्या आगामी 'गांधारी'चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.