सिनेमे फ्लॉप, मानधन घसरलं! 'OMG 2'साठी अक्षय कुमारनं मोठं कॉम्प्रमाईज केलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:35 PM2023-07-13T16:35:06+5:302023-07-13T17:27:15+5:30

OMG 2'साठी अक्षय कुमारनं घेतले केवळ एवढेच पैसे

गेल्या काही महिन्यांत अक्षय कुमारचे निम्याहुन अधिक सिनेमा फ्लॉप झालेत. लवकरच त्याला 'OMG२' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाकडून अक्षयला बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे अक्षयने आपल्या फीस मध्ये कपात केल्याची चर्चा आहे.

अक्षय कुमारने अलीकडच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 'सेल्फी', 'राम सेतू', 'रक्षा बंधन' आणि 'सम्राट पृथ्वीराज' यांसारख्या चित्रपटांच्या फ्लॉपनंतर आता 'OMG२' प्रदर्शित होत आहे. अक्षयचा 'OMG 2' सनी देओलचा 'गदर 2' एकाच दिवशी रिलीज होणार आहेत.

गेल्या काही काळ अक्षर कुमारच्या करिअरसाठी फारसा चांगला नव्हता. त्याचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरु शकला नाही. 'सेल्फी' ते 'सम्राट पृथ्वीराज' सारखे चित्रपट लोकांना अजिबात आवडले नाहीत आणि त्याचा फटका त्यांना कमाईत सहन करावा लागला. याचा परिणाम अक्षय कुमारच्या मानधनावरही झाला.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार अक्षय कुमारने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. 50 ते 100 कोटींपर्यंत फी घेणाऱ्या अक्षयने 'OMG 2' साठी 35 कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, सध्या याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अमित राय दिग्दर्शित, 'OMG 2' हा परेशा राव आणि अक्षय यांच्या जोडीचा 'OMG'चा सिक्वेल आहे. यावेळी चित्रपटात अक्षय कुमारसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला आहे.

'ओह माय गॉड 2' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याआधी त्याचा अहवाल सुधारित समितीकडे पाठवला आहे. चित्रपटातील संवाद आणि सीन्सवर विवाद होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

देव आणि धर्माशी निगडित विषय असेल तर त्याचा अहवाल सेन्सॉर बोर्डाकडून सुधारित समितीकडे पाठवण्यात आला आहे. यावर कमिटी लवकरच निर्णय घेईल. 'आदिपुरुष' सिनेमानंतर ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप झाले, टिकाटिप्पणी झाली यावरुन सेन्सॉर बोर्ड आता दक्ष झालं आहे.