Oscar: रेड कार्पेटवरचा देशी लूक; विदेशात साडी संस्कृती जपल्याने कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 04:15 PM 2023-03-14T16:15:21+5:30 2023-03-14T16:27:25+5:30
रेड कार्पेटवरील ९५ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात यंदा भारताचा झेंडा रोवला गेला. भारतीय सिनेसृष्टीत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यानंतर आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. रेड कार्पेटवरील ९५ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात यंदा भारताचा झेंडा रोवला गेला. भारतीय सिनेसृष्टीत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यानंतर आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
यंदाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकणारा साऊथचा सिनेमा RRR ला ऑस्करच्या शर्यतीत सामील होता. त्यामुळे, आरआरआरची स्टारकास्टही सोहळ्याला उपस्थित होती.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही प्रेजेंटर म्हणून या पुरस्कार सोहळ्यात दिसून आली. दीपिका आणि आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता.
आरआरआर टीम संपूर्ण भारतीय पोशाषात दिसून आली. विशेष म्हणजे आरआरआरच्या कलाकारांमधील महिला वर्गाने भारतीय साडीचा पेहराव केला होता.
अभिनेता रामचरण, दिग्दर्शक राजामौली, एनटीआर ज्युनियर यांच्यासह इतरही भारतीय कलाकारांचा पोषाख सुट बूटातील दिसून आला. त्यामुळेच, भारतीय संस्कृती आणि पेहराव जपल्याचा आनंदही अनेकांना झाला.
यंदा आरआरआरसह द एलिफंट व्हिस्पर्स या डॉक्युमेंटरी चित्रपटालाही यंदाचा ऑस्कर प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची दिग्दर्शिका गुनीत मोंगा ह्याही सोहळ्याला उपस्थित होत्या.
गुनीत मोंगा यांनीही साडी परिधान करुनच ऑस्करची ट्रॉफी उंचावली, त्यामुळे चाहत्यांना अत्यानंद झाला. एकूणच भारतीय महिला कलारांनी साडीची संस्कृती रेड कार्पेटवर झळकावल्याचेही दिसून आले.
कुठल्याही भारतीय प्रोडक्शन हाऊसला मिळालेला हा पहिलाच ऑस्कर अवॉर्ड आहे, त्यामुळेच आजची रात्र ऐतिहास आहे, असे गुनीत मोंगा यांनी ऑस्कर विजयाचा फोटो शेअर करत म्हटले.
ऑस्कर सोहळ्यात रामचरणची पत्नी उपासना हिनेही पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यामुळे, चाहत्यांना ह्या बाबी निदर्शनास येताच त्यांनी सोशल मीडियातून कौतुक केले.
दरम्यान, प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने मोठी कामगिरी केल्याने सर्वांचे लक्ष या पुरस्काराकडे वेधले गेले. सोन्याचा मुलामा असलेल्या ट्रॉफीसह अनेक वस्तू यावेळी विजेत्यांना दिल्या जातात.