‘पापा कहते हैं’चा चार्मिंग हिरो आठवतोय का? आजही दिसतो तितकाच हँडसम अन् स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:40 PM2022-07-29T12:40:46+5:302022-07-29T12:43:43+5:30

Jugal hansraj: वाढत्या वयाच्या खुणा जुगलच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या आहेत. मात्र, त्यातही तो पूर्वीइतकाच स्टायलिश दिसतो.

'पापा कहते हैं' हा चित्रपट ९० च्या काळात विशेष गाजला होता. या चित्रपटात मयुरी कांगो आणि युगल हंसराज ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज २१- २२ वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, या चित्रपटातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

या चित्रपटातील जुगल हंसराजने त्याकाळी तरुणींच्या मनावर अक्षरश: राज्य केलं. त्या काळात तरुणींमध्ये त्याची तुफान क्रेझ निर्माण झाली होती.

जुगलने अभिनेता असण्यासोबतच मॉडल, निर्माता, लेखक, दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे सध्या हा अभिनेता काय करतो?, कसा दिसतो? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.

जुगलने १९८३ मध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली. मासूम या चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.

१९९४ मध्ये आ गले लग जा मध्ये त्याने अभिनेता म्हणून काम केलं. त्यानंतर मोहब्बतें, कभी खुशी कभी गम, सलाम नमस्ते यांसाराख्या चित्रपटात तो झळकला.

जुगलचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

वाढत्या वयाच्या खुणा जुगलच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या आहेत. मात्र, त्यातही तो पुर्वीइतकाच स्टायलिश दिसतो.

आजही जुगलच्या फोटोवर तरुणी कमेंटचा पाऊस पाडतात. जुगलचं लग्न झालं असून जॅस्मिन ढिल्लो हंसराज असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.