'फुलवंती'च्या कलरफुल अदांवर चाहते फिदा! प्राजक्ता माळीच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:36 PM2024-12-04T12:36:33+5:302024-12-04T12:50:52+5:30

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोशूटमुळे.

नुकतेच प्राजक्ता माळीने हटके फोटोशूट केले आहे, जे चर्चेत आले आहे.

प्राजक्ता माळीने कलरफुल टू पीसमध्ये फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो शेअर करत आउटफिट कसाटा आइसस्क्रीमपासून प्रेरीत होऊन बनवल्याचे म्हटले आहे.

यात प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे. तिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीची पहिली निर्मिती असलेला चित्रपट फुलवंतीला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात प्राजक्ता मुख्य भूमिकेत आहे.

नुकतेच प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या शूटिंगलाही सुरूवात केली आहे.