'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ताचा ग्लॅमरस अंदाज, तेजश्री प्रधानचं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 03:36 PM2024-08-03T15:36:31+5:302024-08-03T15:46:57+5:30

Tejashree Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला मिळत आहे. यात तिने मुक्ताची भूमिका साकारली आहे.

तेजश्री प्रधान हिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आहे.

तेजश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

तेजश्री प्रधान हिने ब्लॅक रंगाच्या लेदर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

तेजश्री प्रधान हिने या फोटोत वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

तेजश्री प्रधानच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

तेजश्री सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.