Raha Kapoor At Football Match Video photo Viral With Ranbir Kapoor And Alia Bhatt
किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 09:06 AM2024-12-01T09:06:05+5:302024-12-01T09:14:20+5:30Join usJoin usNext मॅच फुटबॉलची पण चर्चा 'राहा'चीच रंगली! अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट हे कायम चर्चेत असतात. या जोडप्याची 2 वर्षांची मुलगी राहा कपू (Raha Kapoor ) तर नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राहा जिथे जाते, तिथे तिच्या आई-वडिलांसोबत मस्ती करताना दिसते. तिचे क्युट एक्सप्रेशन्स नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आताही राहाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. रणबीर कपूर हा फुटबॉल या खेळाचा प्रचंड चाहता आहे. तो एका फुटबॉल संघाचा मालक आहे. काल 30 नोव्हेंबर रोजी राहा ही आलिया आणि रणबीरसोबत मुंबईत एका फुटबॉल सामन्यादरम्यान दिसली. राहाला पाहताच क्षणी सर्वचजण आलियाचा लेकीवर फिदा झाले. या सामन्यात ती आकर्षणाचेा केंद्र बनली होती. आपल्या वडिलांसारखी निळ्या रंगाची जर्सी घातलेली राहा खूप क्यूट दिसत होती. राहाच्या जर्सीच्या मागील बाजूस 6 हा आकडा लिहिला होता, ज्यावर राहा असेही लिहिले होते. राहाच्या निळ्या जर्सीतील 6 हा आकडा हा खूप खास आहे. कारण ही राहाची जन्मतारीख आहे. आलियाने आपल्या चिमुकलीला कडेवर उचलून घेतल्याचं दिसलं. राहाच्या क्युट एक्सप्रेशन्सनं सर्वांचं लक्ष वेधलं. राहाच्या हातात फुग्याचा पाइप होता. यावेळी तिचा खेळकर अंदाज पाहायला मिळाला. तर आलियाने पांढरा टँक टॉप, काळा शर्ट आणि राखाडी पँट घातली होती. राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. सध्या ती दोन वर्षांची आहे. आतापासूनच तिला कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. राहा सध्या कपूर आणि भट कुटुंबात सर्वांचीच लाडकी आहे. यासोबतच नेटकऱ्यांसह बॉलीवूडमधल्या इतर स्टार्सची सुद्धा खूपच लाडकी आहेटॅग्स :रणबीर कपूरआलिया भटसेलिब्रिटीबॉलिवूडRanbir KapoorAlia BhatCelebritybollywood